मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, महिलांना मिळणार दिलासा.Ladki Bahin Yojana Update

Created by Amit, Date-17 नोव्हेंबर 2025

Majhi Ladki Bahin Yojana : – नमस्कार मित्रानो फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अंतिम टप्प्यात असून सरकारकडून या योजनेबाबत दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ जुलै 2024 पासून सुरू आहे. आतापर्यंत 16 हप्ते वितरित झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर 17 वा हप्ता देण्यात येणार आहे. Majhi Ladki Bahin Yojana

✔ ऑक्टोबरचा हप्ता मिळाला, आता नोव्हेंबरचा लाभ प्रलंबित

काही दिवसांपूर्वी पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. त्यामुळे आता सर्व महिलांचे लक्ष नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे.

हे ही वाचा….निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत का? 

✔ ई-KYC शिवाय लाभ मिळणार नाही – अंतिम मुदत 18 नोव्हेंबर

महिलांनी ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी सरकारने 18 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली असून आता लाभार्थ्यांकडे फक्त दोन दिवस उरले आहेत. राज्यातील 2.35 कोटी लाभार्थ्यांपैकी 1.3 कोटी महिलांची KYC अद्याप बाकी आहे.

Read more  राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांसाठी कडक निर्णय! government employees action

जर मुदत वाढली नाही, तर या प्रचंड संख्येतील महिलांना योजनेतून वगळावे लागू शकते आणि याचा सरकारला निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. Majhi Ladki Bahin Yojana 

✔ KYC ला मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता

विधानसभा निवडणुकीत महिलांच्या मतांनी निर्णायक भूमिका बजावल्याने महायुती सरकार महिलांचा रोष टाळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर KYC प्रक्रियेला लवकरच मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा तुम्ही PF मधून 10,000 रुपये काढले तरी तुमच्या निवृत्ती निधीला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान होईल. हिशोब समजून घ्या. 

✔ पती/वडील नसलेल्या महिलांसाठी वेबसाइटमध्ये मोठा बदल

  1. KYC प्रक्रियेत अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत होत्या.
    विशेषतः—
  2. ज्या महिलांचे पती किंवा वडील हायात नाहीत, त्यांना आधार प्रमाणीकरण करता येत नव्हते.
  3. त्यामुळे त्यांचे KYC अपूर्ण राहत होते.

या संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता अशा लाभार्थी महिलांना—

Read more  अखेर DA वाढला, राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, इतका झाला महागाई भत्ता. DA Hike Allowance

➡ स्वत:चे आधार कार्ड प्रमाणित करून अपूर्ण KYC करण्याची सुविधा देण्यात आली आहे. Majhi Ladki Bahin Yojana 

सरकारने या बदलाची अंमलबजावणी सुरू केली असून 18 नोव्हेंबरपर्यंत अपूर्ण KYC करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर अपूर्ण KYC पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.

Leave a Comment